Advertisement

श्रावणातला पाऊस मराठी निबंध | shravanatala paus marathi nibandh

shravanatala paus marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून श्रावणातला पाऊस मराठी निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

श्रावणातील रिमझिम पाऊसाचे सुंदर वर्णन आपण या निबंधामध्ये पाहणार आहोत.

Advertisement

आम्ही या लेखातून विद्यार्थ्यांना सरावासाठी काही मुद्दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही या ब्लॉगच्या मदतीने विद्यार्थ्यांना निबंध उपलब्ध करून देत आहोत.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

shravanatala paus marathi nibandh

श्रावणातला पाऊस मराठी निबंध

 

पाऊस हा प्रत्येकालाच आवडतो. प्रत्येकजण पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतो. पावसामध्ये भिजण्याचा आनंदच काही वेगळा असतो.

‘श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात पिवळे ऊन पडे’

अशा सुंदर शब्दात बालकवींनी श्रावणात बरसणाऱ्या पाऊसाचे वर्णन केले आहे.”Shravana tala paus marathi nibandh”

आषाढातील मुसळधार पाऊस होऊन गेल्यावर झाडे वेळी तृप्त होऊन जातात. वातावरणात थोडासा गारवा पसरतो. सर्व परिसर हिरवागार होऊन जातो. आकाशात रंगीबेरंगी इंद्रधनुष्य नजरेस पडला की श्रावण महिन्याचे आगमन झाल्याचे समजते.

श्रावणात बरसणारा पाऊस हा अंगावर घेऊ वाटणारा पाऊस असतो. सोनेरी ऊन आणि त्यात पडणारा रिमझिम पाऊस हा अनुभव एक वेगळाच आनंद देऊन जातो.

श्रावणातील पाऊसात आपल्याला उन्ह आणि पाऊसाचा सुंदर खेळ पाहायला मिळतो. शांतपणे बरसणारा हा पाऊस प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो.

श्रावण महिन्यात पाऊसाच्या सरी अधून मधून त्यांनी हजेरी लावत असतात. उन्हामध्ये श्रावणातील पाऊसाच्या सरी मिसळल्या की उन्हामध्ये पाऊस पडतोय की पाऊसात ऊन हेच समजत नाही.

श्रावणातील पाऊसात भिजण्याचा अनुभव खूप सुंदर असतो. सर्व निसर्ग नवचैतन्याने वाहून जातो.

आषाढातील मुसळधार पाऊस आठ दहा दिवस सतत बरसतच असतो. आषाढातील पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाही. या पाऊसामध्ये घराबाहेर पडणेही कठीण होऊन जाते.

श्रावणातला पाऊस

श्रावणमास आला की आषाढातील मुसळधार पाऊसापासून सुटका होते. श्रावणातील रिमझिम पाऊस अंगावर घ्यायला सर्वांनाच आवडतो.

श्रावणातील पाऊस पडल्यावर झाडेही तरतरीत होतात. आपण सर्वजण घराबाहेर पडून स्वछ वातावरणाचा आनंद घेतो. वातावरणात थोडासा गारवा अनुभवायला मिळतो.

निसर्ग एकदम हिरवागार होऊन जातो. आकाशातील इंद्रधनुष्य डोळ्यांचे पारणे फेडतो. कोवळ्या उन्हामध्ये बरसणारा रिमझिम पाऊस हे दृष्य पाहण्यासारखे असते.

सोनेरी उन्हामध्ये पाऊस पडत असेल तर हा पाऊस संपूच नये असे वाटते. उन्हामध्ये पडणारा पाऊस पहिला की सर्वांनाच त्या पाऊसात भिजवेशे वाटते.

श्रावनमासात बरसणाऱ्या पाऊसमुळे निसर्ग प्रसन्न असतो.
पशुपक्षीही आनंदाने उडताना आपल्याला पाहायला मिळतात. (shravanatala paus marathi nibandh)

श्रावण महिना म्हणजे सणांची भली मोठी रांगच. श्रावण महिन्यातील आनंदात रिमझिम पडणारा पाऊस आणखीनच आनंदाची भर घालतो.

shravanatala paus marathi nibandh

हिरवीगार झाडे रिमझिम पाऊस डोक्यावर घेत आनंद साजरा करत असतात. झाडे वेळी टवटवीत बनतात. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवेगार चैतन्य पसरलेले आपल्याला पाहायला मिळते.

श्रावणातील पाऊस हा रिमझिम असल्यामुळे तो अंगावर घ्यायला सर्वांनाच आवडतो. निसर्गाचे मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळते.

श्रावणातल्या पाऊसात पशु पक्षीही आनंदाने नाचत असतात. पक्ष्यांचे छान छान आवाज कानावर पडत असतात.“श्रावणातला पाऊस मराठी निबंध”

श्रावणातील पाऊसाचा आनंद घराच्या खिडकीत बसून घेण्यापेक्षा तो पाऊस अनुभला तर जास्त मिळू शकतो.

श्रावण महिन्यातील वातावरण मनाला उत्साही करणारे असते.

सोनेरी उन्हात पडणारा रिमझिम पडणार पाऊस हे दृश्य पाहिले की हा महिना वर्षभर राहावा असे मनाला वाटते.

ऋतुचक्र व्यवस्थित राहिले तरच आपल्या आजूबाजूला असलेला सुंदर निसर्ग व्यवस्थित राहील. हे ऋतुचक्र नीट चालावे यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे.

आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले तर पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल व आपल्याला श्रावणातील रिमझिम पाऊसाचा आनंद घेता येईल.

तर मित्रांनो तुम्हाला shravanatala paus marathi nibandh ( श्रावणातला पाऊस मराठी निबंध )हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल- sankpal7729@gmail.com

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

हे निबंध सुद्धा जरूर वाचा –

Advertisement

Recent Posts

{ झाडे लावा देश वाचवा }मराठी निबंध | zade lava desh vachava nibandh marathi

zade lava desh vachava nibandh marathi नमस्कार मित्रांनो आज आपण झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध या… Read More

जागतिक पर्यावरण दिन मराठी निबंध | jagtik paryavaran diwas marathi nibandh

Type your search query and hit enter:. jagtik paryavaran diwas marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण… Read More

पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध | Paryavaran samvardhan kalachi garaj marathi nibandh

Paryavaran samvardhan kalachi garaj nibandh in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण पर्यावरण संवर्धन काळाची गरज… Read More

वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध | Vrukshavalli amha soyare vanchare nibandh marathi

vrukshavalli amha soyare vanchare nibandh marathi नमस्कार मित्रांनो आज आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे या विषयावर निबंध मराठी मध्ये… Read More