प्रजासत्ताक दिन निबंध मराठी | Prajasattak din marathi nibandh

Prajasattak din marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून प्रजासत्ताक दिन निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

आपल्या भारत देशामध्ये २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

Advertisement

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

आनंदमयी वातावरणात प्रजासत्ताक दिन भारतभर साजरा केला जातो.

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

prajasattak din marathi nibandh
             prajasattak din marathi nibandh

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी

 

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…

संपूर्ण भारतात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपले स्वतंत्र संविधान  अंमलात आले.

आपल्या भारत देशाला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ दिवशी स्वातंत्र मिळाले.

आपला देश गुलामगिरीतून मुक्त झाला होतो परंतु आपल्या देशाला आपले स्वतःचे संविधान न्हवते.

२९ ऑगस्ट १९४७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

संविधान समितीला आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला.

२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान समितीने आपल्या भारत देशाचे संविधान स्वीकृत केले आणि पुढे २६ जानेवारी १९५० पासून ते लागू करण्यात आले.

२६ जानेवारी १९५० या दिवशी आपला देश प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.Prajasattak din marathi nibandh २०२१

आजचा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदत आणि उस्ताहात साजरा केला जातो. संपूर्ण दिवशभारत आनंदाचे वातावरण असते.

आपला तिरंगा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो.

आपल्या देशातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यातील प्रजासत्ताक दिवस हा एक आहे. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण असल्यामुळे या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

आपला भारत देश विविधतांनी नटलेला आहे. विविध जाती व वर्गातील लोक आनंदात एकत्रित राहतात. आजच्या या दिवशी सर्व जाती व वर्गातील लोक एकत्र येतात आणि हा उत्सव आनंदात साजरा करतात

Prajasattak din marathi nibandh

२६ जानेवारी दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

देशात सर्वत्र ध्वजवंदन करून राष्ट्रगीत म्हंटले जाते.

शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे नियोजन केले जाते.
गावांमधील जेष्ठ नागरिक या शाळेतील मुलांना मार्गदर्शन करतात.

या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो त्यांना बक्षिशे दिली जातात.Prajasattak din marathi nibandh

शाळांमध्ये भाषण, संचलन, प्रभातफेरी चे आयोजन केले जाते. या दिवशी प्रत्येक लहान मुलाजवळ आपला तिरंगी ध्वज असतो.

दरवर्षी २६ जानेवारी निमित्त आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथे कार्यक्रम साजरा केला जातो. या दिवशी मोठे संचलन आयोजित केले जाते.

संचालनाच्या आधी आपल्या देशाचे पंतप्रधान अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर ज्योती जवान येथे पुष्पचक्र अर्पण करतात आणि त्यांनतर ध्वजारोहण व राष्ट्रगीत म्हंटले जाते.

26 January nibandh eassy in marathi

२६ जानेवारी या दिवशी देशाच्या रक्षणासाठी खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करणाऱ्या, आपले देशासाठी कर्तृत्व गाजवणाऱ्या सैनिकांना पुरस्कार देण्यात येतात.

खूप आनंदमय वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

आपल्या भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे सहज मिळालेले नाही. या स्वातंत्र्यासाठी भरपूर विरपुरुषांनी आपले जीवन  देशासाठी वाहून दिले.

आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप वीरांनी आपल्या या भारत भूमीसाठी आपले बलिदान दिले आहे.

आपल्या देशातील विरपुरुषांनी, स्वातंत्रसैनिकांनी आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी खूप मोठे योगदान देऊन आपल्याला स्वतंत्र मिळवून दिले.

आता आपल्याला थांबून कसे चालेल? आपल्याला आपला देश कसा विकसित होईल या कडे लक्ष्य द्यावे लागेल.

आपल्या देशाच्या प्रगतीत कोणत्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतोय अशा गोष्टींवर मात करावी लागेल.

देशातील स्वच्छतेकडे लक्ष्य देऊन आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे. आपल्या देशातील ऐतिहासिक वस्तूंची काळजी घेतली पाहिजे.

मित्रांनो, आम्ही आशा करतो की Prajasattak din marathi nibandh | प्रजासत्ताक दिन निबंध मराठी हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Advertisement

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top