Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून पाऊस पडला नाही तर निबंध मराठी मराठी मध्ये पाहणार आहोत.
पाऊस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. जर पाऊस पडला नाही तर काय नुकसान होऊ शकते हे आपण या निबंधामध्ये पाहणार आहोत.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भरपूर लोकांचा उदरनिर्वाह शेती या व्यवसायावर होतो.
शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नामधून शेतकरी राजा आपल्या गरजा पूर्ण करत असतो.
परंतु आज माझ्या मनात विचार आला जर पाऊस पडला नाही तर काय होईल?
आज खूप थकून भागून कामावरून घरी येत होतो. पाऊसाचे भयंकर वातावरण तयार झाले होते. घरी जाण्याचा माझा कळवळीचा प्रयत्न सुरू होता. आकाशात वीज कडाडू लागल्या होत्या. आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली.
पावसाने भयंकर रूप घेतले होते.अतिशय जोराचा पाऊस झाला. भरपूर व वेळाने पावसाने स्वतःचा मारा कमी केला. पाऊस थांबला.
होऊन गेलेला पाऊस एवढा होता की सगळे रस्ते, ओढे, नाले, पूल पूर्णपणे पाण्याने भरून गेले होते. सगळ्यांनाच घरी जायची घाई झाली होती परंतु जाण्यासाठी मार्गच बंद झाले होते.
माणसांची आणि माझी होत असलेली धावपळ बघून असे वाटले की, पाऊस पडला नाही तर किती चांगले होईल.
पाऊस पडला नाही तर पाऊसामुळे होणारे नुकसान खूप कमी प्रमाणात होईल.
हा निबंध सुद्धा जरूर वाचा – सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी
मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण होणार नाही. पाऊस पडला नाही तर पाणी साचून पिकांचे नुकसान होणार नाही.
हा विचार करत करत मी घरी आलो आणि दूरदर्शन वर बातम्या पाहू लागलो. पाऊसामुळे खूप नुकसान तर झाले होते पण पुन्हा मला आठवला तो पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असणारा आपला शेतकरी राजा.
पाऊस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पाऊसामुळे आपला निसर्ग स्वछ होतो.
पाऊसामुळे आपल्या अजूबाजूला असलेल्या निसर्ग हिरवागार होऊन जातो. पाऊसामुळेच झाडांची शोभा वाढते. वातावरण स्वछ होऊन जाते.(Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh)
आपल्या सर्वाना तर पाऊस आवडतोच पण आपला शेतकरी राजा पाऊसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो.
पाऊसच पडला नाही तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाण्या अभावी शेतकरी पिके पिकवू शकत नाही.
आपल्यापाऊस नाही तर पाणी नाही, पाणी नाही तर शेती नाही, शेती नाहीत तर पीक नाही, आणि पीक नाही तर अन्न नाही. म्हणजेच दुष्काळ येऊन उपासमार होणार.
अजीबाजूला असणारे हे नैसगिर्क सौंदर्य पाऊस नसेन तर नष्ट होऊन जाईल. आपले मन वेधून घेणारा इंद्रधनुष्य आपल्याला पाहता येणार नाही.”paus padla nahi tar nibandh in marathi”
पाऊस नसेन तर दुष्काळाची परिस्तिथी निर्माण होऊ शकते. पाण्याचे साठे संपले तर आपली तहान भागवण्यासाठी पाणी मिळणार नाही.
पाऊसच पडला नाही तर पीक पिकवणे शेतकऱ्याला शक्य होणार नाही.
पाऊस नसेल तर आपले या पृथ्वीतलावर जगणे केवळ अवघड होऊन जाईल. त्यासाठी पावसाचे बरसने गरजेचं आहे.
पाऊस पडून होणाऱ्या नुकसनापेक्षा पाऊस पडला नाही तर होणारे नुकसान हे खूप मोठे आहे.(paus padla nahi tar short essay in Marathi)
आपल्याला पहिल्यांदा झाडांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाऊसाचे पाणी नदी, नाल्यांमध्ये जाण्यासाठी मार्ग केले पाहिजेत.
जर निसर्गाची आपण आतापासूनच काळजी घेतली नाही तर निसर्गाचा ऱ्हास होऊ शकतो. तीनही ऋतू सुरळीत चालू राहिले तर आपले जीवनचक्र सुद्धा व्यवस्थित राहील.
म्हणून आपण निसर्गाची काळजी घेऊया. झाडे लावूया.
पाऊस आहे तर मानवी जीवन व्यवस्तीत आहे. पाऊस आहे म्हणून आपण आहे.
ये रे ये रे पाऊस तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा.
लहानपणीच्या या ओळी आपल्या सर्वांच्याच ओळखीच्या आहेत.
पाऊसात भिजायचा आनंद घेत लहान होऊन जगायचे. आपला आनंद कधीच संपला नाही पाहिजे त्यासाठी पाऊस हा पडलाच पाहिजे.
म्हणून पृथ्वीवरील सर्व जीवांच्या अस्तित्व टिकून राहण्यासाठी पाऊस पडणे गरजेचे आहे.
मित्रांनो, आम्ही आशा करतो की paus padla nahi tar nibandh in marathi| पाऊस पडला नाही तर निबंध मराठी हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.
View Comments
Thanks for sharing such wonderful stuff. Keep sharing and keep up the good work.
Thanks.