माझा आवडता खेळ{ खो खो }निबंध मराठी | maza avadta khel kho kho marathi nibandh

maza avadta khel kho kho marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता खेळ खो खो या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

खो खो हा अतिशय उत्कृष्ट खेळ आहे. याच खेळाची माहिती आपण या निबंधामधून घेणार आहोत.

Advertisement

आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.

maza avadta khel kho kho marathi nibandh
maza avadta khel kho kho marathi nibandh

माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी

 

आपल्या भारत देशात हॉकी, फुटबॉल, बैडमिंटन, क्रिकेट, कब्बडी, खो खो असे अनेक खेळ खेळले जातात. भारतातील मैदानी खेळांपैकी खो खो हा माझा आवडता खेळ आहे.

खो खो हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे व हा खेळ सर्वजण खूप आवडीने व उत्सुकतेने खेळतात.

अतिशय कमी खर्चाचा व खूप आनंद देऊन जाणाऱ्या खेळांपैकी खो खो हा एक खेळ आहे. खो खो या खेळासाठी खेळाडूंचे अथक परिश्रम यांचीच गरज असते.

खो खो खेळणारे खेळाडू शारीरिकदृष्ट्या अतिशय तंदुरूस्त, चपळ असतात.”maza avadta khel kho kho marathi nibandh”

हा खेळ खेळत असताना खेळाडू खूप मेहनत घेत असतात. खो खो खेळातून आपल्याकडे रक्षण, आज्ञापालन हे गुण येतात.

खो खो हा खेळ गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश याठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळला जातो. हा खेळ खेळत असताना कोणताही धोका नसल्याने स्त्री, पुरुष हा खेळ खेळू शकतात.

हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची गरज पडत नाही त्यामुळे कोणीही हा खेळ खेळू शकतो. हा खेळ खेळल्यामुळे शरीर तंदरुस्त व चपळ होते.

Maza avadta khel kho kho marathi nibandh

खो खो हा खेळ खेळण्यासाठी १११ फूट लांब व ५१ फूट रुंद मैदानाची आवश्यकता असते.

खो खो खेळ खेळल्यानंतर शरीरातील आळस पूर्णपणे निघून जातो. हा खेळ खुल्या मैदानात खेळला जाऊ शकतो.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – मला पंख असते तर

खो खो हा खेळ खेळांच्या प्रकारातील पाठशिवणी या प्रकारात मोडतो.

दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो. प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असतो.”माझा आवडता खेळ निबंध मराठी”

प्रत्यक्ष मैदानात ९ खेळाडू खेळतात. उर्वरित तीन खेळाडू राखीव असतात. खेळताना एखाद्या खेळाडूस दुखापत झाल्यास राखीव खेळाडूस खेळवले जाते.

संपूर्ण खेळ हा साधारणतः ३७ मिनिटे खेळला जातो. दोन भागांमध्ये खेळाचे विभाजन केले जाते. दोन विभागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीसाठी वेळ असतो.

या दोन विभागांमध्ये  आणखी दोन उपभाग केले जातात.

पहिल्या उपभागात पहिल्या संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूंचा पाठलाग करतात व दुसऱ्या संघातील खळाडू आपला बचाव करतात.

दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करताना व दुसरा संघ पहिल्या संघातील खेळाडूंचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतात.

दोन उपभागांमध्ये २ मिनिटांचा विश्रांतीसाठी वेळ असतो.

माझा आवडता खेळ निबंध मराठी

खेळ म्हणजे नियम हे आलेच. सुरुवातीला पंचांच्या समोर नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग याची निवड करतो.

पुढील संघाने पाठलाग करण्याचा निर्णय घेतला तर त्या संघातील ८ खेळाडू दोन खांबांमध्ये असलेल्या चौकोनात आळीपाळीने एकमेकांपासून विरुद्ध दिशेला तोंड करून बसतात.

बचाव करणाऱ्या संघातील ३ खेळाडू मैदानात असतात व पाठलाग करणाऱ्या संघातील एक खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा असतो.

खेळ सुरू होताच पाठलाग करणाऱ्या संघातील ९ वा खेळाडू वाचाव करणाऱ्या संघातील ३ खेळाडूंना बाद करण्यासाठी प्रयत्न करतो.maza avadta khel kho kho marathi nibandh

पाठलाग करत असताना खेळाडू एकमेकांना खो देतात.  या खेळाचे काही नियम कडक असल्यामुळे खो देणाऱ्या खेळाडूने खो हा शब्द मोठ्याने उच्चारणे गरजेचे असते.

जर एखाद्या खेळाडूने नियमांचे पालन केले नाही तर त्या खेळाडूस बाद केले जाते.

खो खो खेळातील महत्वाचा नियम म्हणजे पाठलाग करणारा  ९ वा खेळाडू  आपली दिशा बदलू शकत नाही.

बचाव करणारा खेळाडू ज्या बाजूस आहे त्या बाजूस तोंड असेल त्या खेळाडूलाच पाठलाग करणारा खेळाडू खो देऊ शकतो.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – माझा आवडता छंद 

ज्या खेळाडूने खो दिलेला आहे तो खेळाडू ज्याला खो दिला आहे त्याची जागा घेतो.

बचाव करण्याऱ्या खेळाडूला बाद करत असताना खेळाडूंमधील चपळाईचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते.

Maza avadta khel kho kho marathi nibandh

खो खो खेळामध्ये नियम फक्त पाठलाग करणाऱ्या खेळाडूस नसून बचाव करणाऱ्या खेळाडूस सुद्धा असतात.

बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास तो खेळाडू बाद होतो.

बचाव करणाऱ्या संघातील तीनही खेळाडू बाद झाल्यानंतर  पुढील तीन खेळाडू मैदानात येतात.’माझा आवडता खेळ निबंध मराठी’

एक खेळाडू बाद केल्यानंतर पुढील विरुद्ध संघाला १ गुण दिला जातो. दोन्ही भागात जो संघ गुणांमध्ये आघाडीवर असतो तो संघ विजयी होतो.

खो खो हा खेळ अतिशय चांगला आहे. अलीकडे भरपूर ठिकाणी खो खोचे सामने भरवले जातात.

शाळांमध्ये हा खेळ खेळण्यास मुलांना प्रोत्साहन दिले जाते. शाळांमध्ये खो खोच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा भरवल्या जातात.

आपल्या देशात खो खोच्या राष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय कुमार स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा, राष्ट्रीय महिला स्पर्धा या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

आपण जे खेळ खेळत असतो त्यातून आपल्यामध्ये सांघिक भावना निर्माण होण्यास मदत होत असते. आपण जे खेळ खेळतो त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. आपले आरोग्य नीट राहण्यास मदत होते.

खो खो खेळण्याचे खूप फायदे आहेत. या खेळामुळे आपल्या मेंदूची विचार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे एखादा योग्य निर्णय आपण लवकरात लवकर घेतो.

खो खो खेळामध्ये माझा पूर्ण व्यायाम होतो. या खेळाचे फायदे भरपूर आहेत. त्यामुळे मला हा खेळ खेळायला खूप आवडतो.

भारतीय खो खो खेळाडूंची नावे-
  • सतीश राय
  • सारिका काळे
  • पंकज मल्होत्रा
  • मंदाकिनी माझी
  • प्रवीण कुमार

तर मित्रांनो तुम्हाला “maza avadta khel kho kho marathi nibandh” (माझा आवडता खेळ खो खो)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल- [email protected]

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Advertisement

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *