marathi rajbhasha din nibandh नमस्कार
मित्रांनो आज आपण मराठी राजभाषा दिन या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
सर्वप्रथम सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या.
आपला भारत देश हा विशाल आहे. आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. वेगवेगळ्या प्रदेशानुसार भाषा बदलत असते.
आज आपण या लेखातून मराठी भाषेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
२७ फेब्रुवारी हा दिवस कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, नाटककार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.
‘marathi rajbhasha din nibandh’:-कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. तसेच यांच्या अनेक कविता तरुणांनामध्ये स्फूर्ती निर्माण आहेत.
२७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
मराठी राजभाषा दिनाला मराठी भाषा गौरव दिन असेही म्हटले जाते.
हा निबंधसुद्धा जरूर वाचा – मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध
आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे.
मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. आपल्या भारत देशातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे.
मराठी भाषा ही जास्त प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये वापरली जाते.
गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड या ठिकाणीसुद्धा मराठी भाषा बोलली जाते.
दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात मराठी भाषा बोलली जाते.
आपली मराठी भाषाही भारत देशात तर बोलली जातेच त्याचबरोबर फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशातही बोलली जाते.
आपल्या भारत देशातील अनेक लोक शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेरील देशात म्हणजेच दक्षिण आफ्रिका, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड जातात त्यामुळेही मराठी भाषा या देशातही बोलली जाते.
मराठी भाषेचा समावेश हा भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत केला आहे .“मराठी राजभाषा दिन निबंध”
अनेक संतांनी मराठी भाषेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये केला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला.
संत ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेबद्दल सुंदर शब्दात म्हणतात-
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
अनेक संतांनी ग्रंथांची रचना करून मराठीमध्ये भर घातली. संतांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा गौरव केला आहे.
संत एकनाथ महाराज यांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली व ग्रंथांची भर मराठी साहित्यात घातली.
आपल्या देशातील कवी, लेखक यांनी आपल्या लेखणीतून तसेच कवितांमधून मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मातीचे रक्षण केल्यामुळे मराठी भाषा सुद्धा सुरक्षित झाली.
आपल्या देशातील भरपूर लोक याच मराठी मातीत घडले. सचिन तेंदुलकर, लता मंगेशकर यांसारखी अनेक यशस्वी लोक याच मराठी मातीत घडली.
मराठी राजभाषा दिनादिवशी अनेक शाळांमध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा कार्यक्रमाचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्व मुलांना सांगितले जाते.
आत्ताच्या या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इंग्रजी भाषा येणेसुद्धा गरजेचे आहे.
आपल्याला मराठी भाषेसोबतच हिंदी, इंग्रजी भाषा अवगत असणेही गरजेचे आहे. “marathi bhasha nibandh 2021”
पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेऊन देतात. प्रत्येक पालकांना वाटते की आपला मुलगा खूप शिकवा आणि चांगल्या नोकरीला लागावा.
परंतु दुसऱ्या भाषा शिकत असताना आपल्या मराठी भाषेचे महत्वसुद्धा टिकून राहणे गरजेचे आहे.
पालकांनी मुलांना मराठी भाषेचे महत्व सांगितले पाहिजे. आपल्या देशात अनेक संतांनी, कवींनी भरपूर ज्ञान आपल्याला दिले आहे तेही आपण वाचले पाहिजे.
मुलांना आपल्या मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे.
आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे मराठी बोलण्याचा प्रयत्न आपण करू शकतो
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. आपल्या भाषेचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दरयाखोर्यांतील शिळा.
कवी कुसुमाग्रज यांच्या या ओळी मनामध्ये ठेवूया आणि आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्यापासून सुरवात करूया.
मित्रांनो तुम्ही या निबंधसाठी असेही शीर्षक देऊ शकता-
१)मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी 2021
२)मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध
३)माझी मराठी भाषा निबंध
तर मित्रांना तुम्हाला “marathi rajbhasha din nibandh” (मराठी राजभाषा दिन)हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ मराठी राजभाषा दिनाबद्दल काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल – nibandhmarathi@gmail.com
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.