२६ जानेवारी भाषण मराठी २०२१ | 26 January Speech in Marathi 2021

नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून २६ जानेवारी भाषण मराठी २०२१ | 26 January Speech in Marathi 2021

Advertisement
मराठी मध्ये पाहणार आहोत.

२६ जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय जनतेमध्ये उत्तहाचे वातावरण असते. संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शाळांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्यासाठी मदत म्हणून आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

 

२६ जानेवारी भाषण मराठी २०२१ 

 

भाषणाला सुरवात करण्यापूर्वी या आनंदमयी प्रसंगी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

माझे नाव——-आहे. मी इयत्ता—-कक्षेतील विध्यार्थी आहे.

सर्वप्रथम प्रजासत्ताकदिनानिमित्त इथे जमलेले माझे आदरणीय शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी आणि पालक यांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

26 January Speech in Marathi 2021
               26 January Speech in Marathi 2021

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…

संपूर्ण देशभरात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

अनेक विरपुरुषांच्या मेहनतीमुळे १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटिश राजवटीपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झाला होता परंतु आपल्या देशाला आपले स्वतःचे संविधान न्हवते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपल्या भारत देशाचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीला तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला होता.

संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी भारत देशाचे संविधान स्वीकृत केले व पुढे २६ जानेवारी १९५० या दिवसापासून ते अमलात आणण्यात आले.”26 जानेवारी भाषण मराठी 2021″

आपल्या संविधानामुळे भारतीय जनतेला मूलभूत हक्क मिळाले. देशहितासाठी योग्य सक्षम नेतृत्व निवडता यावा म्हणून मतदान हा हक्क देण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हणतात.

प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीय जनतेसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो.

आपला देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी भरपूर विरपुरुषांनी, स्वातंत्रसैनिकांनी आयुष्यभर कष्ट घेतले आपले संपूर्ण जीवन  देशहितासाठी वाहून दिले.

आपला भारत देश हा विविधतांनी नटलेला आहे. सर्वजण आनंदाने एकत्रित राहतात. आजच्या दिवसाचे विशेष म्हणजे सर्व जाती व वर्गातील लोक एकत्रित येऊन हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.

26 January Speech in Marathi 2021

आपण आता जो मोकळा श्वास घेत आहे तो आपल्या देशातील स्वातंत्रसैनिकांमुळे ज्यांनी स्वतःची काळजी न करता देशाची काळजी करण्याला महत्व दिले.

आपल्या भारत देशात अनेक थोरपुरुष होऊन गेले. त्यांनी ब्रिटिश राजवटीशी समाना करत आपल्याला गुलामगिरीतून कायमचे मुक्त केले.

आपल्या देशातील थोर पुरुषांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठे त्याग करून आपले आयुष्य सुखकर केले आहे.

आजही सीमेवर सैनिक देशाच्या रक्षणासाठी उभा आहे.

आपल्या भारत भूमीसाठी खूप विरपुरुषांनी आपले बलिदान दिले आहे आणि त्यांच्या या महान कर्तृत्वामुळे प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये ते आहेत.

मित्रांनो, आपल्या देशातील विरपुरुषांनी त्यांचे कर्तव्य केले परंतु आता वेळ आपली आहे. आपण आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची.

आपण आपल्या देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. देशामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार केला पाहिजे.

आपल्या देशाच्या विकासासाठी ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत आहेत त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि या सर्वांची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे.

आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशहितासाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे.

मला इथे बोलण्याची संधी दिली व माझे भाषण तुम्ही शांतपणे आणि काळजीपूर्वक ऐकले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो.

Advertisement

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top